स्वातंत्र्य


Sagar Misal



स्वातंत्र्य

एकाच प्रश्नाने घातलय विळख्यात मनाला 
स्वतंत्र भेटलय का खरंच आपल्याला...
का होते गोरे आधी शोषण करायला 
आलेत आता काळे आणि गोरे दोन्हीही
बेइमानी च्या चिखलाने माखलेत सर्व 
दिसत नाही सध्या कुठे  इमानदारी चा गर्व 
स्वतंत्र भेटलय का खरंच आपल्याला...
........
........
कुठे विकली जाताय भ्रूण तर कुठे अब्रू लुटली जाते 
ढोंग्याच्या बाजारात आता फक्त हवस मिटवली जाते .....
अल्ला आणि देव सुध्दा भेटत नाही आता मदजित आणि मंदिरात ...
गीता कुराण वर तर फक्त ठेवला जातोय गुन्हेगारांचा हात ....
खरंच भेटलंय का  स्वतंत्र आपल्याला  .....
.....
...
WhatsApp आणि फेसबुक च्या या संदेशामधे
माणुसकीचं पत्र हरवत चाललंय ......
भारतमातेच्या कुशीत जन्म घेतल्याची जाणीव संपत चाललीय
स्वाभिमान विसर्जित होतोय  राजकारणाच्या  आणि.
देशद्रह्यांचा वास येतोय त्यांच्या नालायक राजनीति मध्ये ....
भेटलय का खर स्वतंत्र आपल्याला ....
.......
.......
वाढताय सीमेवरील वीरांच्या कथा.... लढता ,लढता दयनीय झालीय त्यांची व्यथा .....
गप्पा सुध्दा वाढताय यावर राजनीती च्या... 
शहिदांच्या सरणावर पण भाजतात पोळ्या या  नेत्यांच्या ....  ... 
कधी भेटेल का खर  स्वातंत्र्य आपल्याला  ..
.....
.....
नको  आता बंदूक  ना आता तलवार हवी 
आता  फक्त एका विचाराची क्रांती हवी ...
प्रत्येक भारतीयाच्या मनातला 
हिंदुस्तान हवा हीच एक इच्छा हवी ... 
मगच भेटलं खर स्वातंत्र्य आपल्याला ..... 
                      - सागर मिसाळ 

Share Article :




You may also like